Advertisement

Main Ad

नियोजन भवन येथे "31 ऑगस्ट" हा दिवस "भटके विमुक्त दिवस" म्हणून साजरा केला जाणार





सोलापूर, दिनांक 29:- इतर मागास बहुजन कल्याण विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "31 ऑगस्ट" हा दिवस "भटके विमुक्त दिवस" म्हणून जिल्ह्यात साजरा केला जात आहे. यानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नियोजन भवन येथील सभागृहात दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे.
      या कार्यक्रमास जिल्ह्यातील भटके विमुक्त समाजाची उपस्थिती असून त्या ठिकाणी आश्रमशाळेतील विविध पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील भटके विमुक्त प्रवर्गातील नागरीक/लाभार्थी/विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांनी केले आहे. 
             ******

Post a Comment

0 Comments