सोलापूर : बुलेटच े सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाच े मॉडिफाईड सायलेन्सर बसविणाऱ्य ा बुलेटराजांवर सोलापूर शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत वाहतूक पोलिसांनी तब्बल ५२५ मॉडिफाईड सायलेन्सर काढून जप्त केले. त्या सायलेन्सरवर आज (मंगळवारी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोडरोलवर चालविण्यात आले.
सोलापूर शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या दुचाकी वाहनांमध्य े बुलेटची संख्या मोठी आहे. बुलेट घेतल्यावर हौसी तरूण त्याचे सायलेन्सर मॉडिफाईड करतात. त्यामुळ े रूग्णालये, शाळा- महाविद्यालयांसमोरील रोडवरून ये-जा करताना त्या सायलेन्सरच्या मोठ्या आवाजाचा सर्वांना त्रास होतो. त्यासंबंधीच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या उत्तर विभागाचे पोलिस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे व उत्तर विभागाचे पोलिस निरीक्षक सुरज चाटे यांच्या नेतृत्वात अंमलदारांनी मॉडिफाईड बुलेटवर कारवाई केली.
१ जानेवारी ते ३१ मे या पाच महिन्यात उत्तर विभागान े ११५ तर दक्षिण विभागान े ४१० मॉडिफाईड सायलेन्सर जप्त केले. त्या प्रत्येक दुचाकीस्वारांकडून एक हजार रूपयांप्रमाणे एकूण पाच लाख २५ हजार रूपयांचा दंड केला आहे. सायलेन्सर किंवा नंबरप्लेटमध्य े बदल केल्यास वाहतूक नियमानुसार एक हजार रूपयांचा दंड होतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

0 Comments