सोलापूर : - पंढरपूर आषाढी वारी २०२५ दरम्यान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजन आणि वारकऱ्यांसाठी अंमलात आणलेल्या सुसंगत सेवांबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या वेळी आयोजित कार्यक्रमात शाल,बुके व विठ्ठल-रुक्माईची प्रतिमा देऊन जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
वारी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था आणि वारकऱ्यांना दिलेली तत्पर मदत याबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.कार्यक्रमात बोलताना पत्रकारांनी सांगितले की,
“या वर्षी जिल्हा प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे वारी अत्यंत शांततापूर्ण, सुगम आणि सुरक्षित वातावरणात पार पडली. याचे श्रेय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते.”
जिल्हाधिकारी यांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटले की,“वारी म्हणजे फक्त एक धार्मिक यात्रा नव्हे, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. हा सन्मान म्हणजे संपूर्ण प्रशासन आणि पथकासाठी प्रेरणादायी आहे.

0 Comments