Advertisement

Main Ad

आदिवासी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी विकास योजनांच्या लाभासाठी अर्ज करावे

सोलापूर दि.20 (जिमाका) :- महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लीअस बजेट) योजने अंतर्गत आदिवासी समाजाचा विकास व्हावा याकरिता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात, प्रस्तुत योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सोलापूर जिल्हयाकरीता सन 2025-26 या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या तरतुदीतून योजना राबविण्याकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थी यांनी https://www.nbtribal.in या वेबसाईट वर अर्जदाराची प्रथम नोंदणी करुन ऑनलाईन नमुद ज्या वैयक्तीक / सामुहिक (बचतगटाच्या) योजनेस अर्ज करावयाचा आहे त्या योजनेस ऑनलाईन पध्दतीने दिनांक 02 जुन, 2025 ते 15 जुलै, 2025 या कालावधीमध्ये अर्ज सादर करण्यात यावेत. तथापी केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लीअस बजेट) योजने अंतर्गत अ गटातील वैयक्तीक /सामुहिक प्रस्तावित असणा-या योजनेस आजतगायत या कार्यालयास ऑनलाईन अर्ज हे खुपच कमी प्रमाणात प्राप्त झालेले आहेत.
तरी योजनानिहाय अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://www.nbtribal.in या पोर्टलवर करणे आवश्यक असुन ऑनलाईन अर्ज करताना अशी खुण असलेली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यास काही अडचणी आल्यास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर, सीटीओ इमारत (बीएसएनएल), संगमेश्वर कॉलेज समोर, सात रस्ता, सोलापूर -413003 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन योजनांचे अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबत तसेच कार्यालयात माहिती सुविधा केंद्र उपलब्ध असुन ऑनलाईन अर्ज भरुन देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याबाबत आणि अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना 15 जुलै, 2025 पर्यंत मुदतीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन लाभ घेण्याचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर सागर नन्नवरे यांनी जाहिर अवाहन केले आहे.
                                                 0000

Post a Comment

0 Comments