२,२८४ बॅलेट युनिट सुस्थितीत असल्याचे मंगळवारच्या पाहणीत समोर आले. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. तर मतदान केंद्र वाढून ८९१ होणार असल्याचा अंदाज आहे. आयोगाने महापालिकेकडून ईव्हीएमचा आढावा अहवाल मागितला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ईव्हीएमची पाहणी केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरात ८१० मतदान केंद्र होते. त्यामध्ये दहा टक्के वाढीव मतदान केंद्राचा समावेश करून महापालिका निवडणुकीसाठी किती मतदान केंद्रे होतील अशी विचारणा आयोगाने केली. त्यानुसार ८९१ मतदान केंद्रे होतील, असा अहवाल आयोगाला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेकडे १,२१८ ईव्हीएम आणि २,२८४ बॅलेट युनिट वापरण्या योग्य असल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि रवी पवार यांच्यासह ईव्हीएम मशीनचे नोडल अधिकारी तपन डंके, गोडाऊन प्रमुख ओम वाघमारे आदी उपस्थित होते.

0 Comments