सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमकपणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करत असून पत्रकारांच्या बाबतीत नेहमी सजग व दक्ष भूमिका घेऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांना टोल मधून मुक्ती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी यासह राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच रस्त्यावर उतरून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर संघटक पदी विश्वमत युवा पत्रकार कबीर तांडूरे यांची नियुक्ती केली असून सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे यांच्या हस्ते कबीर तांडुरे यांचा ओळखपत्र नियुक्तीपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सोलापूर शहरातील *पत्रकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार नूतन संघटक कबीर तांडूरे
पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा नियमित प्रयत्न करतअसून पत्रकार सुरक्षा समिती वतीने आज माझी सोलापूर शहर संघटक पदी नियुक्ती केले असून सोलापूर शहरातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे मनोगत नूतन संघटक कबीर तांडुरे यांनी व्यक्त केलं आहे
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सचिव अंबादास गज्जम ज्येष्ठ पत्रकार डॉ. कीर्तीपाल गायकवाड सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिदगीड्डी समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद सतीश गडकरी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

0 Comments