Advertisement

Main Ad

विजापूर रोडवरील मसाज सेंटर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या माया फॅमिली स्पा सेंटरवर कारवाई..

सोलापूर (प्रतिनिधी)- माया फॅमिली स्पा सेंटर अत्तार कॉप्लेक्स नोबेल हॉऊस दुसरा मजला, विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरुन दि. २३/०५/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता गेले असता आरोपीने पोलीस बिल्डींगमध्य येऊ नये म्हणून लिफ्ट बंद केली होती तसेच जिन्याचे लोखंडी गेट कुलूप लावून बंद केले होते. शेजारी बिल्डींग मध्ये असलेली लोखंडी शिडी पोलीसांनी शिताफिने मिळवून पहिल्या मजल्यावर प्रवेश करून छापा टाकला. त्या ठिकाणी ०४ पिडीत महिला मिळून आल्या. पिडीतांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत होता. सदर स्पा सेंटर हे आरोपी नामे विशाल चंद्रकांत धोत्रे वय ३२ वर्षे राहणार नुराणी मस्जीद च्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर १ जुना विजापूर नाका, सोलापूर आणी माया फॅमिली स्पा चा मालक नामे संदेश साळवे राहणार ठाणे यांच्यावर मपोह/०७ अकिला युसुफ नदाफ यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण येथे गुरन. २२३/२०२५ येथ अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५, ६ सह भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १४३ (२) (३) १४४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना न्यायलयाने आरोपीची गुन्ह्याच्या तपासकामी दिनांक २७/०५/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर वेश्याव्यवसाय चालत असल्यास त्याबाबची माहिती पोलीसांना द्यावी.
सदरची कामगिरी ही प्रभारी पोलीस आयुक्त श्री. अजित बोऱ्हाडे व मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरिक्षक महादेव राऊत, सफौ. हेमंत मंठाळकर, पोहेका/महादेव बंडगर, मपोहेका अकिला नदाफ, मपोहेका सुशिला नागरगोजे, मपोहेकों/नफिसा मुजावर, मपोका / सुजाता जाधव, मपोका / सीमा खोगरे, मपोका / उषा मळगे, मपोका १२२७ चिकमळ पोहे/१४१७ शैलेश बुगड नेमणूक गुन्हे शाखा चालक पोका ७२४ दादा गोरे यांनी शिताफिने कामगीरी करून सदरचा छापा यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments