Advertisement

Main Ad

बापानेच केला ९ वर्षांच्या मुलीचा खून; कुसूरमध्ये घराशेजारी खड्यात पुरले प्रेत


सोलापूर - पोटच्या नऊवर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला आणि घराशेजारी खड्डा करून बापाने तिचे प्रेत पुरले. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे गुरुवारी (दि. २३) मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. आरोपी बापाने स्वतः गळा दाबून हत्या केल्याची कबुली नातलगासमोर दिली. ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे (३४) असे संशयित आरोपीचे नाव आहे. कोठे कुटुंब शेतातील वस्तीवर राहते. ओगसिद्ध याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. पत्नीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, एक मुलगा आणि दोन मुली गावातच आजोळी मुक्कामी गेल्या होत्या. मयत श्रावणी आजोबा रेवणसिद्ध यांच्या जवळ झोपली होती. उशिराने ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या वडिलांकडे गेली. रात्री ओगसिद्धने तिचा गळा दाबून खून केला. घराशेजारील खड्डा
श्रावणी कोठे खोदून तिला पुरून टाकले. सकाळी आजोबांनी नात श्रावणीची चौकशी केली. आजोळी तसेच गावात शोध घेतला. नातलग वस्तीवर जमले. घराशेजारी खड्ड्यातील माती, त्याकडे चिखलात गेलेली पावले पाहून संशय आला. मंद्रूप पोलिसांना कळविण्यात आले. नातलगांनी विचारले असता वडिलांनी मी स्वतः रात्री तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.

अंगावर होता शाळेचा गणवेश-
महानंदा पाटील व मनोहर नरोटे यांनी या घटनेची माहिती मंद्रूप पोलिसांना दिली. मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, हवालदार शहानूर मुलाणी, अविनाश पाटील, दिनेश पवार, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी रुषभ कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी खोदकाम करून श्रावणीचा मृतदेह बाहेर काढला. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता. हलका पाऊस झाल्यामुळे तिच्या अंगावर माती चिकटलेली होती. यावेळी श्रावणीची मावशी जयश्री होनमाने, सुनीता वडियार, आजी मधुरा खांडेकर, आजोबा रेवणसिद्ध कोठे व मामा अवधूसिद्ध खांडेकर यांनी तिला ओळखले. त्यानंतर श्रावणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात हलविला.

Post a Comment

0 Comments