सोलापूर : हवामान विभागाने रविवार, १८ मे रोजी शहर आणि परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यापुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रविवारी ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने सुटणारे वारे याचा अनुभव काही भागांत येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारनंतर १९ ते २१ मे या कालावधीतही पावसाची शक्यता असून या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळातही हलक्यापासून स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. मध्यम शुक्रवारी (१७ मे) शहरात कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यापूर्वी गुरुवारी (१६ मे) हे तापमान ३५.२ अंश सेल्सिअस होते. रविवारी पाऊस झाल्यास तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमानात झालेली वाढ आणि अचानक येणारा पाऊस यामुळे हवामानात मोठा बदल जाणवतो आहे. मागील तीन महिन्यांपासून उन्हाच्या झळांचा त्रास सहन करणाऱ्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तापमान ४० अंशाच्या आतच राहत आहे.

0 Comments