सोलापूर- रस्त्यावर बेधडकपणे वाहनांना जादा आवाज करणारे सायलेन्सर बसवून ध्वनिप्रदूषण करणारे, नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांवर गुरुवारी सायंकाळी संत रोहिदास चौक, संत तुकाराम चौक येथे वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत एकूण ४० वाहनांकडून बावीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
दोन्ही ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांनी अचानक कारवाई सुरू केली. यात १० बुलेटवर कारवाई करत सायलेन्सर काढून घेतले. एका गाडीचालकाकडून प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला.
शिवाय मल्टिहॉर्न लावणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. शिवाय विनालायसन्स, फॅन्सी नंबर प्लेट, विनानंबर प्लेट आदी कारवाया करण्यात आल्या. यावेळी एकूण २२ हजारांचा चालू व मागील दंड वसूल करण्यात आला. कारवाईवेळी सपोनि. कुकडे, सपोनि. हंडाळ, पोसई प्रवीण पारडे व सफौ. गायकवाड, पोलिस शिपाई मल्लाव, परीट, गाडे, पनासे, मपोशी राठोड उपस्थित होते.

0 Comments