Advertisement

Main Ad

कार्यालयीन अधीक्षक जाधव, सहाय्यक राऊळची उचलबांगडी*



सोलापूर : डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षक पदावरील शैलेश जाधव व वरिष्ठ सहाय्यक हरिप्रसाद राऊळ या दोघांची उचलबांगडी केली आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिनी असलेल्या अभिवादन कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक यांनी विलंब केल्याचे प्रकरण त्यांना भोवले आहे. जाधव यास सातारा व राऊळ यास धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली आहे. तसा बदलीचा आदेश वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी यांनी शुक्रवारी काढला आहे.
अभिवादनाच्या मुद्द्यावरून बहुजन विकास आघाडीसह इतर मागासवर्गीय संघटनांनी आक्षेप घेत त्या दोघांना निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यावरून वैद्यकीय शिक्षण विभागाकडून चौकशीसाठी राज्य स्तरावरून शासकीय त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली.


*बदलीसाठी प्रशासकीय कारण*
वैद्यकीय शिक्षण आयुक्त यांनी काढलेल्या बदलीच्या आदेशात कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्वरीत रूजू होण्यास सांगितले आहे. कार्य मुक्त करून तात्काळ अहवाल संचालक कार्यालयास द्यावा असे म्हटले आहे. अधिष्ठाता संजीव ठाकुर यांना दोन्ही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले की नाही याची माहिती घेण्यासाठी फोन केला असता, त्याच्याशी संपर्क झाला नाही.

Post a Comment

0 Comments