Advertisement

Main Ad

वेठबिगार कामगार मुक्तता मोहीम अंतर्गत....झारखंडची महिला व तिच्या चार मुलांची वेठबिगारीतून मुक्तता

सोलापूर, दिनांक 25:- झारखंड राज्यातील स्थलांतरित कामगार नियंत्रण कक्ष (Migrant Workers Control Room) कडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे आज मौजे चुंब, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे वेठबिगार कामगार मुक्तता मोहीम राबविण्यात आली, 

या मोहिमेदरम्यान, आरोपी झाकीर इलाही सय्यद याच्या शेतावर एक महिला व तिच्या १० ते ९ महिने वयाच्या चार अल्पवयीन मुलांना वेठबिगार स्वरूपात कामावर ठेवलेले आढळले. संबंधित महिला व तिच्या चार मुलांना मुक्त करण्यात आले असून प्रांताधिकारी सोलापूर यांचेकडून त्यांचे मुक्तता प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे. सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी दिली.

आरोपी विरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला आणि तिच्या मुलांना स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या मूळगावी, गढवा, झारखंड येथे रेल्वेने पाठविण्याची सोय करण्यात आली आहे.

या मोहिमेसाठी श्री. बाळासाहेब वाघ, अपर कामगार आयुक्त पुणे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. निलेश येलगुंडे, सहायक कामगार आयुक्त सोलापूर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या कॅरल परेरा यांचे सहकार्य देखील लाभले. 

या प्रकारच्या मोहिमा वेठबिगारीविरोधात लढा देण्यास महत्त्वपूर्ण असून, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळवून देण्यात येत आहे.
           ********

Post a Comment

0 Comments