Advertisement

Main Ad

अनधिकृत, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसोलापूर दि.18 (जि.माका):- सोलापूर

 जिल्‍ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालुन अनधिकृत व अवैध वाहतुक होत असल्याच्या तक्रारी या कार्यालायास प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर तक्रारींची तातडीने दखल घेऊन, या कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांमार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली . या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
  त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर च्या कार्यक्षेत्रातील अनाधिकृत व अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम राबविण्यात आली असून सदर तपासणी मोहिमेमध्ये एकुण 121 वाहनांची सखोल तपासणी केली असता दोषी आढळून आलेल्या एकूण 43 वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई दरम्यान दोषी वाहनांकडून एकूण रू.186800/- इतका दंड आकारण्यात आला आहे. 
अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे.
 

00000

Post a Comment

0 Comments