Advertisement

Main Ad

दि. 02 व 03 डिसेंबर रोजी मतदान व मोजणी कारणास्तव आठवडेबाजार बंद आदेश



सोलापूर दि.28 (जिमाका):- मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2025 दिनांक-04 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे.
ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचेकडील प्राप्त निर्देशानुसार मतदाना दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान प्रक्रिया निर्भयव व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
  सार्वत्रिक नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक 2025 च्या जाहीर कार्यक्रमानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मतदान दिनांक-02 डिसेंबर 2025 व मतमोजनी दिनांक-03 डिसेबर 2025 रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे व यास अनुसरुन सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मतदाना दिवशी वार मंगळवार दिनांक-02 डिसेंबर 2025 व मतमोजनी दिवशी वार बुधवार दिनांक-03 डिसेबर 2025 खालील तक्त्यात नमुद नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार भरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्या नुसार जिल्हादंडाधिकारी, कुमार आशीर्वाद, सोलापूर,यांच्या अधिकारान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम 37(3) व दि. मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट 1862 मधील कलम 5 (ग) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन, सार्वत्रिक नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक- 2025 च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी खालील नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार दि.02 व 03 डिसेंबर 2025 रोजी भरविण्यास मनाई करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.
पंढरपूर नगरपरिषद- मतमोजणी चे ठिकाण – शासकीय धान्य गोडाऊन पंढरपूर. - वार मंगळवार
दुधनी नगरपरिषद – मतमोजणीचे ठिकाण – दुधनी नगरपरिषद सभागृह- वार मंगळवार
                                                        00000

Post a Comment

0 Comments