सोलापूर, दि. ७ : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती–भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी सुरू करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक गणेश सोनटक्के यांनी केले आहे.
प्रवेशासाठी पात्रता :
- बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशा १२ वी नंतरच्या व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी (बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून)
- अर्ज संकेतस्थळावर : https://hmas.mahait.org
- अर्ज कालावधी : १ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०२५
सोलापूर जिल्ह्यातील वसतिगृहांची उपलब्धता :
- १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींसाठी १ व मुलांसाठी १ असे दोन शासकीय वसतिगृहे कार्यान्वित
शासकीय वसतिगृह असलेल्या जिल्ह्यांसाठी सुधारीत वेळापत्रक :
- अर्ज कालावधी : ३० सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर २०२५
- अर्ज छाननी : २७ ते ३० ऑक्टोबर
- पहिली निवड यादी : ३१ ऑक्टोबर
- प्रवेश अंतिम मुदत : १० नोव्हेंबर
- दुसरी निवड यादी : १३ नोव्हेंबर
- प्रवेश अंतिम मुदत : २० नोव्हेंबर
शासकीय वसतिगृह नसलेल्या जिल्ह्यांसाठी वेळापत्रक :
- अर्ज कालावधी : ३० सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर
- अर्ज छाननी : २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
- पहिली निवड यादी : २० नोव्हेंबर
- प्रवेश अंतिम मुदत : २८ नोव्हेंबर
- दुसरी निवड यादी : १ डिसेंबर
- प्रवेश अंतिम मुदत : ८ डिसेंबर
गुणवत्तेनुसार निवड झालेल्या परंतु वसतिगृह क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाल स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत विचारात घेतले जातील, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
********

0 Comments