सोलापूर : एम. के. किड्स स्कूलमध्ये दीपावली सण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेले आकर्षक आकाशकंदील व शिवनेरी किल्ल्याची सुंदर प्रतिकृती हे या वर्षीच्या दीपोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमादरम्यान गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धा तसेच नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या स्टोरी कॉम्पिटिशन च्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे सरकारी वकील ॲड. देवयानी किणगी व राहुल बिराजदार होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य शिक्षिका दिपाली कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर पालक सभेच्या निमित्ताने पालक प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला तसेच पालकांना मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या ॲड. देवयानी किणगी म्हणाल्या, “पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राहुल बिराजदार, अंजली गुरव, स्कूलच्या मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, ट्रस्टी विकास कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद आणि सेविकांनी मनापासून परिश्रम घेतले. यामध्ये अश्विनी सिंगन, पुनम कळसाईत, शितल सुतार आणि सेविका संगीता हेगडकर यांचा विशेष सहभाग राहिला

0 Comments