सोलापूर, दि. ७(जिमाका) : युरोपियन युनियन व इतर देशांना फळपिकांची निर्यात सुनिश्चित करण्यासाठी अपेडाच्या हॉर्टीनेट प्रणालीद्वारे शेतनोंदणी प्रक्रिया राबविली जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्यातून आजअखेर ४१ हजार ८४५ तर सोलापूर जिल्ह्यातून २० हजार ८१ निर्यातक्षम फळबागांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व बागायतदारांनी चालू हंगामाकरिता हॉर्टीनेट प्रणालीद्वारे नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- विहीत नमुन्यातील अर्ज
- ७/१२, ८अ उतारे
- बागेचा नकाशा
- आधार कार्ड
पिकानुसार नोंदणी कालावधी :
- ग्रेपनेट (द्राक्ष) : १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५
- मँगोनेट (आंबा) : १ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६
- अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट, बिटलवाईननेट, ओनियननेट, ऑद्रर फुटनेट : वर्षभर नोंदणी सुरू
शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत नोंदणी पूर्ण करून निर्यातक्षम बागांची पात्रता सुनिश्चित करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
******

0 Comments