Advertisement

Main Ad

अतिवृष्टीने प्रभावित सोलापूरकरांना न्याय द्या!"📍 सोलापूर



मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस मुंबई–सोलापूर विमानसेवेच्या शुभारंभ करण्याकरिता सोलापूर शहरात आले असता, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी, पिके, रस्ते आणि मालमत्तेचे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर प्रभावित शेतकरी व नागरिकांना तातडीने मदत मिळावी, अशा मागणीसह परिस्थितीची सविस्तर माहिती त्यांना दिली.

यावेळी चर्चिलेले प्रमुख मुद्दे :

१) सप्टेंबर २०२५ मध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावांतील अंतर्गत रस्त्यांचे झालेले नुकसान व दुरुस्तीबाबत चर्चा केली.
२) अतिवृष्टी आणि पुरामुळे मतदारसंघातील कालवे व वितरण व्यवस्थेचे झालेले नुकसान तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.
३) नदीकाठच्या वाहून गेलेल्या किंवा खरडून गेलेल्या शेतीजमिनींच्या पुनर्स्थापनेसाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत जलसंपदा विभागाची यंत्रसामग्री वापरण्याबाबत मागणी केली.
४) पाण्याखाली गेलेल्या ऊस पिकास तातडीने गाळप करण्यासाठी कारखान्यांकडे घेऊन जाण्याचा निर्णय प्राधान्याने घेण्यात यावा, अशी मागणी केली.
५) अतिवृष्टीबाधित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यांच्या उभारणीसंदर्भात आलेल्या अडचणींची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याची गरज व्यक्त केली.
६) पूरस्थितीत नागरिकांच्या स्थलांतरासाठी कायमस्वरूपी निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडला.
७) महापुरामुळे झालेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍याच्या नुकसानीची तात्काळ दुरुस्ती करण्याची विनंती केली.
८) तसेच, देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कार्यक्रमांच्या कार्य अहवालाचा आढावा सादर केला.

अतिवृष्टीमुळे नागरिकांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्वरित मदत व प्रभावी उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा यावेळी मा. देवेंद्रजींकडे व्यक्त केली. यावेळी त्यांनी सदर मागण्या गांभीर्याने घेऊन आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

#Solapur #FloodRelief #Maharashtra #BJP #Ativrushti #अतिवृष्टी #सोलापूर #Farmers #सोलापूर_विमानतळ #SolapurAirport

Devendra Fadnavis 
CMOMaharashtra 
BJP Maharashtra

Post a Comment

0 Comments