प्रचलीत नियमानुसार माहे नोव्हेंबर २०२५ अखेर पर्यंत आपले हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे जमा करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
जिल्हयांतील दुसरे महायुध्द लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला व त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र व बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत या कार्यालयामध्ये प्रत्येक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत जमा करावे. ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे प्राप्त होत नाहीत त्यांचे अनुदान माहे नोव्हेंबर २०२५ पासून बंद करण्यात येईल व हयातीचे दाखले प्राप्त झालेनंतर फरकासह अनुदान देण्यात येईल, असे पत्रकात नमूद आहे.
जिल्हयातील दुसरे महायुध्द लाभार्थ्यांनी लवकर आपले हयातीचे दाखले जमा करावे. तसेच ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे अशा लाभार्थ्याच्या मृत्यूचा दाखला अर्जासहीत त्यांच्या अवलंबितांनी लवकरात लवकर जमा करावा, असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
000

0 Comments