Advertisement

Main Ad

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ : उमेदवार निवडीसाठी जिल्हा पातळीवर कौशल्य स्पर्धांचे आयोजन


सोलापूर, दि. २४ (जिमाका) : सन २०२६ मध्ये शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल आणि विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने एकूण ६३ क्षेत्रांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या स्पर्धांचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. जागतिक स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष असून खालीलप्रमाणे पात्रता निश्चित करण्यात आली आहे :
- १३ क्षेत्रांकरिता (उदा. Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Mechatronics, Robot System Integration, Industry 4.0 इत्यादी) : उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००१ किंवा त्यानंतरचा असावा. - इतर ५० क्षेत्रांकरिता : उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा त्यानंतरचा असावा. या स्पर्धेसाठी पात्र उमेदवारांची नोंदणी खालील संस्थांमधून करता येईल.  
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई, टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट्स, कॉर्पोरेट टेक्निकल इन्स्टिट्यूट्स, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसवीव्हीईटी, फाइन आर्ट्स कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था.
नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊन ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी. जिल्ह्यातील सर्व संबंधित संस्थांनी पुढाकार घेऊन ही माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सहायक आयुक्त संगीता खंदारे (जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर) यांनी केले आहे.
000000

Post a Comment

0 Comments