सोलापूर दि. 25 (जिमाका):-शासनाने राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 12 नंतरच्या व्यवसायीक व बिगर व्यवसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या व बारावी मध्ये कमीत कमी 60 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना खालील प्रवर्गातील रिक्त जागेवर प्रवेश देणे चालु आहे.
व्यवसायिक विभाग- इतर मागास वर्ग (OBC), वि. जा.भ. ज.(VJNT) , वि.मा.प्र.(SBC) , दिव्यांग, अनाथ.
बिगर व्यवसायिक विभाग- इतर मागास वर्ग (OBC), वि. जा.भ. ज.(VJNT), दिव्यांग, अनाथ.
वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या सुविधा व अनुदान- मोफत निवास, बेंडीग साहित्य, भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, नाईट ड्रेस, वैद्याकिय विद्यार्थ्यांकरिता ॲप्रेन व इतर साहित्य, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ब्रॉयलर सुट व ड्रायव्हिंग बोर्ड , शारीरीक शिक्षण/ शिक्षणशास्त्र महाविद्यालय गणवेश, शैक्षणिक सहल , प्रोजेक्ट रिपोर्ट, इ. करीता अनुदान दिले जाते.
तरी वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपला अर्ज त्वरीत https://hmas.mahait.org. या संकेतस्थळावर भरावे. अधिक माहितीसाठी 9890676908 या क्रमांवर संपर्क साधवा. अशी माहिती गृहपाल सी. वाय. जाधव यांनी दिली आहे.
00000

0 Comments