Advertisement

Main Ad

धारदार शस्त्राने जबर मारहाण प्रकरणी शिक्षा लागलेल्या खटल्या मधून चार आरोपींची अपिलातून निर्दोष मुक्तता




सोलापूर (प्रतिनिधी)- यात एफ आय आर मधील हकिकत अशी की फिर्यादी व त्याचा मावस भाऊ श्रीराम सुरेश गायकवाड हे दोघे हिरो होंडा मोटरसायकल वरून राहते घराकडून एसटी स्टँड जवळील मित्राच्या मोबाईल दुकानाकडे जात असताना जुनी मिल कंपाऊंड समोरील रोडवर यातील सर्व आरोपी बेकायदा मंडळी जमवून फिर्यादीस तू आमच्याकडे का बघतो बे असे म्हणून शिवीगाळ केल्याने झालेल्या तक्रारीवरून आरोपी नंबर 1) बाळू तलाठी याने श्रीराम सुरेश गायकवाड यांचे डोक्यावर लोखंडी पाईप ने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच आरोपी नंबर 2) गुरुनाथ कावडे यांनी देखील हॉकी स्टिकने मारहाण केली त्यावेळी यातील फिर्यादी हे घाबरून पळून जात असताना इतर आरोपींनी त्याच्यावर दगडफेक केल्याने त्याचे उजव्या हातावर मुक्कामार लागलेला होता तसेच साक्षीदार विजय अंबादास पाटील यांची टाटा सुमो रोडवर उभी असलेल्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडून नुकसान केले म्हणून फौजदार चवळी पोलीस स्टेशन येथे आरोपींवर भादवि कलम 143,147,148,149,326,336,427,504 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. यात आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण सुनावणी होऊन मे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोळपकर मॅडम यांनी आरोपी शिवराज उर्फ बाळू नागनाथ तलाठी,गुरुनाथ 
सिद्धारेडी कावडे,किरण बन्सीलाल परदेशी व नारायण गोविंद मडिवाळ यांना भादवि कलम 143,147,148,149 326,336 प्रमाणे तीन महिने कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशाप्रमाणे दि.29/03/2023 रोजी शिक्षा सुनावली होती. 

यावेळी सर्व आरोपींनी मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे ॲड अखिल शाक्य यांच्यामार्फत शिक्षेविरोधात अपील दाखल केले होते. त्यानंतर संपूर्ण अपिलाची सुनावणी झाल्यानंतर आरोपी यांच्यातर्फे ॲड अखिल शाक्य यांनी मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो यांनी आरोपीविरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसताना सुद्धा त्याचा विचार न करता शिक्षा दिलेली आहे असे युक्तिवादामध्ये सांगितले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश जे जे मोहिते साहेब यांनी सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 
सदर केस मध्ये सर्व आरोपी/अपिलार्थी तर्फे 
ॲड अखिल.आर. शाक्य ,ॲड अजिंक्य .आर .शाक्य,ॲड हर्षल शाक्य ,ॲड दर्शना चक्रवर्ती,ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पहिली

Post a Comment

0 Comments