सोलापूर, दि. 29 (जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी, महाशी, मदारी, राधेमांग, गोराडी, मादगी व मादिगा या समाजातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना व थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.
शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 या वित्तीय वर्षासाठी भौतिक व आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झाले असून, जिल्हा कार्यालय सोलापूरमार्फत दिनांक 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2025 दरम्यान कर्ज मागणी अर्जांचे वितरण व स्वीकृती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कालावधीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जदारांनी स्वतः जिल्हा कार्यालयात उपस्थित राहून अर्ज व आवश्यक कागदपत्रांची माहिती घ्यावी. फक्त परिपूर्ण कर्ज प्रकरणेच स्वीकारली जातील. त्रयस्थ व्यक्तीमार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. बीजभांडवल व थेट कर्ज योजनेंतर्गत मंजुरीनंतर जामीनदार देणे आवश्यक राहील.
तरी वरील समाजातील गरजू व होतकरू नागरिकांनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशांत तेलंग, जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांनी केले आहे.

0 Comments