*अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२५ आहे.
सोलापूर, दि. ७ ऑगस्ट (जिमाका) – विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’ देण्यात येणार असून, इच्छुकांनी २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.) यांनी केले आहे.
* पुरस्कारासाठी पात्रता:
- राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व पुरस्कार विजेते
- साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, संगणक, उद्योजकता व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
- देश-राज्याची प्रतिष्ठा वाढवणारे योगदान
- शैक्षणिक क्षेत्रात १०वीत ९०%, १२वीत ८५% पेक्षा अधिक गुण, पदवी/पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक, IIT/IIM/AIIMS प्रवेशित विद्यार्थी
* अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. वैयक्तिक अर्ज
2. विहित नमुन्याचा फॉर्म (डी.डी. ४०) – कार्यालयात उपलब्ध
3. बोनाफाईड दाखला
4. मार्कशीटची प्रमाणित प्रत
5. ओळखपत्राची छायांकित प्रत
6. डिसचार्ज बुकमधील फॅमिली डिटेल पानाची झेरॉक्स
7. बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत
8. आधार कार्ड प्रत
9. कार्याची पुष्टी करणारी प्रमाणपत्रे, वर्तमानपत्रातील प्रसिद्धी, फोटो इ.
* अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख:
२४ सप्टेंबर २०२५ – त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
* अधिक माहितीसाठी संपर्क:
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर
दूरध्वनी: ०२१७–२९९२३६६
******

0 Comments