उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गा मध्ये वाढ करून आज दिनांक- 19.08.2025 रोजी सायंकाळी 7:00 वाजता 40000 क्यूसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येणार आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
हे आपल्या माहितीसाठी सविनय सादर.
स. शि. मुन्नोळी
कार्यकारी अभियंता,
उजनी धरण व्यवस्थापन विभाग,
भीमानगर.

0 Comments