Advertisement

Main Ad

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी श्री. बिंगी यांच्याकडून 55 हजार 555 चा धनादेश सुपुर्द



सोलापूर, दिनांक 25 (जिमाका):- येथील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षासाठी श्री. अंबादास व्यंकय्या बिंगी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे 55 हजार 555 रुपयांचा धनादेश देणगी म्हणून सुपूर्द केला.
       यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष डॉ. अविनाश खांडेकर, सदस्य कैलास चौधरी, कपिल गायकवाड तसेच रोहिणीताई तडवळकर रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिडी, श्रीहरी म्याकल, लक्ष्मण गायकवाड नागेश गंजी आदी उपस्थित होते.
   यावेळी डॉ. खांडेकर यांनी नियोजन भवन येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्ष कडून गरजू रुग्णांसाठी करण्यात येत असलेल्या मदतीची माहिती दिली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय कक्षातून मदतीसाठी संपर्क करण्याचे आव्हानही यावेळी त्यांनी केले.
    सोलापूर जिल्ह्यातील देणगीदार, नागरिकांनी या कक्षासाठी सढळ हाताने मदत करावी, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. 
                ********

Post a Comment

0 Comments