सोलापूर : तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विजापूर रस्त्यावरील उध्दवनगर भाग-२ येथे १२ ऑगस्ट २०२३ ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडली.
याप्रकरणी अंजली सूर्यकांत शिवशरण (वय २८, रा. चंडक मळा, विश्व नगर, विजापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौतम आप्पा शिंदे, सरोज गौतम शिंदे आणि रितेश गौतम शिंदे (सर्व रा. उध्दवनगर भाग-२) यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी गौतम शिंदे, सरोज शिंदे आणि रितेश शिंदे यांनी फिर्यादीला तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात २६ लाख ६१ हजार ५०० रुपये घेतले. मात्र, नोकरी लावली नाही आणि फिर्यादीने पैसे परत मागितले असता आरोपींनी टाळाटाळ केली, त्यामुळे फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार पवार हे करीत आहेत.

0 Comments