यशवंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे लवकरच . बैठक घेऊन ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार बांधवांना पत्रकार सुरक्षा समिती मध्ये सहभागी करून लवकरच पत्रकारांच्या प्रश्नावर लढा उभा करणार असल्याची माहिती अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार बगाडे यांनी दिली असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार बांधवानी पत्रकार सुरक्षा समिती मध्ये सामील होण्याचे आवाहन देखील केलं आहे पत्रकार सुरक्षा समिती गेल्या आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास खंडणी सारख्या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी पत्रकारांच्या वाहनाना टोल मधून मुक्ती या सह राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आंदोलन उपोषण त्याच बरोबर राज्य सरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे आपण संघटित असल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष नंदकुमार बगाडे यांनी केल आहे शहरी आणी ग्रामीण असा कोणताही भेदभाव न करता पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील सर्वच पत्रकारांसाठी काम करत असून प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वखाली वेळोवेळी आंदोलन उपोषण करून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम राज्यात पत्रकार सुरक्षा समिती करत असून राज्यात अनेक जिल्ह्यात पत्रकार सुरक्षा समिती काम सुरु असून आपण देखील राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्या साठी एकत्र येऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवण्या चा प्रयत्न करायला हवं असं ही अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार बगाडे यांनी स्पष्ट केलं आहे.

0 Comments