सोलापूर : पगारापेक्षा जास्त पैसे कमविण्याचा लोभ अनेकांचा सुटेनासा झाल्याचे चित्र जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे लाचखोरी करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील १२ जणांवर सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहरासह जिल्ह्यातील लाचखोरीच्या दररोज नव्या-नव्या घटना उघडकीस येत आहेत. विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोकसेवकांकडून लाचेची मागणी केली जाते. यामुळे सामान्य व्यक्ती त्रस्त आहे. यामुळे अशा लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी सजगतेने वागत, अशांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे यावे. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल, असे आवाहन 'एसीबी'कडून करण्यात येत आहे.
अनेक लाचखोर हे कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत, रोख रक्कम स्वतः मार्फत किंवा खासगी व्यक्तींच्या माध्यमातून करतात, अशावेळी खासगी इसमासह मागणी करणारा आणि घेणारा यांच्यावरही कारवाई केली जाते. सोलार मीटर परवानगीसाठी मागितले पैसेसोलार मीटर बसण्यासाठी मंजूर स्थळांची पाहणी करून परवानगी देण्यासाठी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता महिला अधिकाऱ्याने खासगी इसमाकडून १६ हजार रुपये मागितले.
तडजोडीअंति आठ हजार रुपये स्वीकारले. या तिघांवर ही दि. २० मे रोजी कारवाई करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
*लाचखोरांच्या संख्येत वाढ*
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत सोलापुरात दि. १ जानेवारी २०२४ ते ५ जून २०२४ यादरम्यान ११ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा ही संख्या एकने वाढून १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
*मागणी केली... अडकला*
भूमिगत गटार व सिमेंट रस्ता करण्यासाठी केलेल्या कामाच्या बिलातील अडीच लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी पाच हजारांची लाच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाने केली. याबाबत पडताळणी ही झाली. नंतर मात्र तक्रारदार पुढे येण्यास तयार नसल्याने सरकारकडून याबाबत गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा २८ मे रोजी दाखल करण्यात आला होता.

0 Comments