Advertisement

Main Ad

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० वाहन चालकांचे परवाने रद्द*



सोलापूर : वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. यात मद्य प्राशन करुन वाहन चालवणे, ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग व अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांचे वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची धडक कारवाई सरू करण्यात आली आहे.

मागील पाच महिन्यात एकूण ८० वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. यात जानेवारीमध्ये ३८, फेब्रुवारीमध्ये ७, मार्चमध्ये १४, एप्रिलमध्ये ८, मेमध्ये १३ असे एकूण ८० वाहन चालकांचे वाहन परवाने रद्द केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments