सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या तथा भीम आर्मी सोलापूर शहर अध्यक्षा विशाखा उबाळे ज्यांनी संपूर्ण बहुजन समाजासाठी वंचित पिडीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचा नेहमीच प्रयत्न केला असून समाजसेवेचा ध्यास मनी घेऊन निरंतर त्यांनी सामाजिक काम चालू ठेवले आहे नेहमीच गोरगरिबांची अडचण असो वा कोणतेही काम असो एका हाकेत धावून जाणारे असे व्यक्तिमत्त्व आणि ओळख विशाखा उबाळे यांची निर्माण झाली आहे समाजाच आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने नेहमीच सामाजिक क्षेत्रात उबाळे हे स्वतःला झोकून देऊन काम करतात. त्यांच्या कार्याचा नेहमीच सर्वत्र कौतुक होतो.अश्या या निस्वार्थी आणि सामाजिक कामाची ओढ असणाऱ्या विशाखा उबाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांचा पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर अध्यक्षा महिला विभाग रक्षंदा स्वामी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना विशाखा उबाळे म्हणाले की सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी माझ्यासाठी दाखवलेले प्रेम विश्वास नेहमीच याप्रती मी जाण व आदर करून सामाजिक क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही माझ्या आज वाढदिवसाच्या सत्कारामुळे माझ्यावर आणखी जबाबदारी वाढली असून नेहमीच गोरगरीब वंचित पिडीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त घटकांसाठी काम करेन अशी भावना व्यक्त करत सत्काराला व उपस्थित पत्रकार बंधू भगिनींचा आभार मानले याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर शहराध्यक्ष आन्सर तांबोळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षअमर पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे अजमेर शेख शहर सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद शहर संघटक कबीर तांडूरे योगेश स्वामी बेलीफ अशोक खेडगीकर लक्ष्मी माने कल्याणी कुंभार इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

0 Comments