Advertisement

Main Ad

सोलापूर शहरात गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुगाच्या गजरात उत्साहात आगमन ; महापालिका प्रसाशन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली पूजा




सोलापूर - शेगावचे संत गजाजन महाराज ही एकमेव पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे सोलापूर शहरातून जाते. पालखीचे उत्साहाने स्वागत आज शहरात रूपा भवानी चौकात पालखीचे आगमन झाल्यानंतर करण्यात आले. यावेळी महापालिका प्रसाशनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी स्वागत केले. 

या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार,पोलीस आयुक्त एम राजकुमार,उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय खबाडे,पोलीस उपायुक्त अजित बिऱ्हाडे,उपायुक्त दीपाली काळे, महापालिका सह. आयुक्त शशिकांत भोसले, सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर नरेंद्र काळे,माजी नगरसेवक संजय कोळी,राजकुमार पाटील, बाबुराव जमादार यांच्या उपस्थिती होती.गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरांमध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याची अनुभूती आल्याचे सांगताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले या चैतन्यमय प्रसंगी पांडुरंगचरणी सोलापूरवासीयांना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतो. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महानगरपालिकेकडून दिनांक 29 व 30 जून रोजी श्री गजानन महाराज पालखीच्या अनुषंगाने जवळपास 700 वारकरी सामील असून त्यासाठी महानगरपालिका द्वारे योग्य त्या उपयोजना करण्यात आल्या असून 24 तास सेवा ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्या पद्धतीने पालखी मार्ग वरील सर्व रस्त्यांचे डागडुजी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर स्वच्छता साठी उपाययोजना करण्यात आलेले आहेत. पालखी मुक्काम हा कुचन प्रशाला व उपलब्ध मंगल कार्यालय आहे तेथे ही आरोग्याच्या, स्वच्छतेच्या व इतर सुविधा महानगरपालिकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी महानगरपालिका यंत्रणा ही सज्ज असल्याची माहिती दिली.पोलीस प्रशासनाकडून चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगाने विशेष सूचना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments