सोलापूर - सोलापूर जिल्ह्यामध्ये गरीब, गरजू लोकांचे आर्थिक परिस्थिती खूपच गंभीर असून यांना कुठले सोयी नसून यांना सरकारी मान्यता राशन मिळत नाही. जिल्हा अधिकारी यांना भेटून राशन मिळत नाही असे तक्रार अर्ज देऊन सुद्धा काम होत नाही, राशन मिळत नाही खूप मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दहा वर्षापासून राशन बंद झाले. सगळ्यांना राशनची खूप खूप गरज आहे. इकडे पैसे देवून राशन घ्यावे म्हणजे तर संजय गांधी निराधार पेन्शर योजना, श्रावण बाळ योजना या लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळत नाही.पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती आहे की गरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे राशन तसेच निराधाराचे योजनेचे पेन्शन वेळेवर मिळावे अशा आशयाचे निवेदन विघ्नहर्ता सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी भीमाशंकर कोळी सह अन्य उपस्थित होते.

0 Comments