सोलापूर - इथेच किलबिलते विश्व उद्याचे
सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सुरभी बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज लहान गट ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात शालेय परिसरामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव हाजी शब्बीर शेख सर, प्रमुख अतिथी म्हणून सोलापूरच्या माझे महापौर सौ श्रीकांचना यन्नमताई, बालभारती प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हाजी रिजवान शेख सर, बालभारती माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री इम्तियाज मुल्ला सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीमाई फुले मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित अतिथींचा सत्कार करण्यात आला.
सोलापूरच्या माजी महापौर यन्नमताई यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.
मुले म्हणजे देवाघरची फुले या उक्तीप्रमाणे बालचमूंच्या पायांचे ठसे घेत त्यांना प्रवेशित करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष मुख्याध्यापक, शिक्षक यांनी स्वतः ढोल वाजून विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत सत्कार केला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेळकुंदे मॅडम तर आभार हाजी रिजवान शेख यांनी मानले....
यावेळी अतिथींनी आपल्या भावी आयुष्याची योग्य दिशा ठरविण्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

0 Comments