सोलापूर- एका गावात पाच जोडप्यांचे विवाह जमले असतील तर त्याच गावात विवाह सोहळा करण्याचा मानस आ. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार शुक्रवारी लोकमंगल फौंडेशनच्यावतीने 45 वा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा बोरूळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे आ. सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सहा जोडपे विवाह बंधनात अडकले.
लोकमंगलच्या सामुदायिक विवाह सोहळ्याने व्यापक स्वरूप घेतले आहे. आगामी काळात दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात विवाह सोहळा करण्याचा करण्याचा नवा उपक्रम लोकमंगलने सुरू केला आहे. त्यानुसार बोरोळे गावातील सहा जोडप्यांनी लोकमंगल फौंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर लागलीच आ. देशमुख यांनी बोरूळ गावात गावभोजनासहित विवाह सोहळा करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी झालेल्या सोहळ्यात 6 हिंदू जोडपी विवाहबद्ध झाली. या वधू- वरांना आ. देशमुख यांच्याहस्ते शालू, सपारी, मणी मंगळसूत्र, रुखवत साहित्य देण्यात आले. यावेळी अविनाश पाटील, भोजपा हिपळे, परमेश्वर कासे, बलभीम हिपळे, ईरप्पा नागणसुरे, सिद्धाप्पा शिंगारे, सुरेश कापसे, सैपन पटेल, माळाप्पा बन्ने, सूरज हिपळे, रेवणसिद्ध जाधव, खाजप्पा चिन्नेकर, फाउंडेशन संचालक मारुती तोडकर, प्रल्हाद कांबळे, उत्तम शिंदे, सुजाता सुतार व विजय होनमुठे यांच्यासह हजारो वर्हाडी मंडळी उपस्थित होते. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी ओंकार पाटील व त्यांचे मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.

0 Comments