सोलापूर : मोठ्या जल्लोषात मिरवणुकीत नाचत सहभागी झालेल्या तरुणाने राहत्या घराच्या समोर असलेल्या सलून दुकानात वापरण्यात येणाऱ्या कापडाच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने गुरुवारी आत्महत्या केली. शुभम सिध्देश्वर राऊत (वय २३, रा. विद्या नगर २, शेळगी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.मयत शुभमचे शेळगी परिसरात सलूनचे दुकान आहे. बुधवारी रात्री तो मित्रांसोबत घराबाहेर गेला होता. बाहेरून तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी त्याच्या मित्राला फोन करून विचारल्यावर तो आपल्या सोबत नसल्याची माहिती त्या मित्रांनी दिली. दरम्यान, शुभम हा रात्री उशिरा दुकानी आला. त्यानंतर त्याने कपड्याच्या सहाय्याने छताच्या लोखंडी हुकाला गळफास घेतला. पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान त्याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि बहीण आहे.

0 Comments