सोलापूर : तडीपार आदेशाचा भंग करणारा सराईत गुन्हेगार कासिम उर्फ सोहेल शफिक शेख (वय-२८, रा. मुल्ला बाबा टेकडी सिद्धेश्वर पेठ सोलापूर) याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
कासिम याच्यावर मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राने दुखापत करणे, कोणाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, घरफोडी करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे गैर कायद्याची मंडळी जमविणे, दगडफेक करणे, घातक शस्त्राने धमकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तो साथीदाराच्या मार्फत करत आला आहे. त्याच्यावर गंभीर अशा स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल अशी कृत्ये सुरूच ठेवली. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारीकृतीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, फौजदार चावड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, साहेब पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एमपीडीए पथकातील अंमलदार हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव आदींनी केली.

0 Comments