Advertisement

Main Ad

द्वारकाधीश मंदिरात सोमवारपासून घळसासी यांचा भागवत कथा ज्ञानयज्ञ



सोलापूरदि. १८ मे (शहर प्रतिनिधी) :- येथील दिलीप जवळगेकर परिवाराच्यावतीने सोलापूरच्या विजापूर रोडवरील द्वारकाधीश मंदिरात निरुपणकार विवेक घळसासी यांचा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय पाठक यांनी दिली आहे.
हा ज्ञानयज्ञ सप्ताह सोमवार दिनांक १९ मे रोजी सुरू होत असून तो रविवार दिनांक २५ मे अखेर असा सलग सात दिवस चालणार आहे. द्वारकाधीश मंदिरात दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत हा ज्ञान यज्ञ सोहळा होत आहे. या सात दिवसात विवेक घळसासी हे भागवत कथेचे निरुपण करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून भाविक भक्तांनी, नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन जवळगेकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments