Advertisement

Main Ad

धनगर समाजातील शाखा-उपशाखा सोडून देऊन सर्वांनी धनगर म्हणून एकसंघ व्हावे....प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांचे वधू-वर मेळाव्यात आवाहन

.

सोलापूर दि.२६ धनगर समाजात शाखा-उपशाखा आहेत. त्या सोडून देऊन आपण सगळे एकच आहोत ही भावना बाळगा. धनगर म्हणून आपण सर्वजण एकसंघ आहोत हीच आपली ओळख असायला हवी, अशी अपेक्षा प्रा. डॉ.यशपाल भिंगे यांनी व्यक्त करून समाजातील शाखा- उपशाखांनी एकसंघ होण्याचे आवाहन केले.

विजापूर रोड येथील सुंदर मल्टीपर्पज हॉल सभागृहात राजमाता सामाजिक प्रतिष्ठान तर्फे रविवार (दि.२५) नववा वधू-वर पालक परिचय मेळावा झाला. या मेळाव्यास डॉ. भिंगे हे मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र नागणकेरी, शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.अनिल कोकीळ, शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख मा.प्रा.डॉ.अजय दासरी, दिव्यांग मंत्रालय चे आयुक्त विजय म्हस्के, कार्याध्यक्ष डॉ.रामचंद्र धर्मसाले , उपाध्यक्ष मा. चंद्रकांत धालपे आदी उपस्थित होते. 

         प्रा.डॉ. भिंगे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आपण सदैव समोर ठेवावा. प्रतिकूल परिस्थितीतही बळ येते. होळकर घराण्याने ज्याप्रमाणे घरातील महिलांना स्वातंत्र्य दिले, त्याचप्रमाणे आपणही महिलांना स्वातंत्र्य द्यावे. महिला चांगले काम करू शकतात, याचा आदर्श आपल्यापुढे आहे. धनगर समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्यात समाजाच्या सर्व शाखांनी एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करावेत. किंबहुना हे मिळावे हे धनगर समाजातील शाखा उपशाखांनी व त्यातील वधू-वरांनी एकत्रित येऊन फक्त धनगर म्हणून विवाह करावेत. वधू वर मेळाव्यातील अशा घटना धनगर समाजाला एकत्रित आणण्याचे पथदर्शक ठरतील, त्याकरिता समाजातील सर्व युवक युतीने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
या वधू-वर मेळाव्यामध्ये सुमारे १२०० ही पेक्षा पालक व विवाहेच्छुक वधू व वरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात पालकांनी आपल्या मुला-मुलींचा बायोडाटा वाचून दाखवून परिचय करुन दिला. कार्यक्रम सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत सुरु होता. मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील कर्नाटक येथूनही पालकांनी हजेरी लावली. 
यावेळी प्रा. डॉ. वासंती पांढरे, श्रीकांत मिरगाळे,सुहास गडदे, भाऊसाहेब चोरमले, अशोक नरोटे, पांडुरंग गोफणे, निरंजन कागे, सदाशिव व्हनमाने, सचिन लांडगे, संजय बनसोडे,दिलावर शेख ,स्वामी सर, गुरव सर आदी उपस्थित होते.
00000

Post a Comment

0 Comments