सोलापूर (प्रतिनिधी)- माता रमाईंच्या पुतळ्या विषयी बहुजन समाज पार्टीनचे सर्व सुचना ऐकून त्याचे निरसन करून माता रमाई चा पुतळा मुळ स्वरुपात व कोणाचा आक्षेप नसेल असा करण्याची ग्वाही मुर्तीकार सुभाष आल्हाट यांनी दिली. वेळोवेळी महापालिका प्रशासनास निवेदन देऊन योग्य पाठपुरावा करून सदरील माता रमाई यांचा पुतळा मूळ स्वरूपात कसा असावा याची प्रचिती करून दिले त्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या मागणीला यश आले आहे.बहुजन समाज पक्ष महामानव आणि महामाता यांच्या विचारांना जोपासण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून येते. माता रमाई यांच्या पुतळ्याची पुनश्च पाहणी केली याप्रसंगी बसपा शिष्टमंडळाकडून सुभाष आल्हाट यांना माता रमाईंचा फोटो भेट देण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र झोन इन्चार्ज ॲड संजीव सदाफुले, आप्पासाहेब लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलु गायकवाड, शहर अध्यक्ष देवा उघडे,शहर प्रभारी सुहास सुरवसे,शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, प्रविण गायकवाड,अशोक जानराव, भारतीय बौद्ध महासभेचे आण्णासाहेब वाघमारे, शारदा ताई गजभिये उपस्थित होते.


0 Comments